Kharghar Heat stroke: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास, 7 ते 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती!

Eknath Shinde On heat Stroks: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharastra Bhushan Award) कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. जवळपास 500 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उष्माघाताने 7 ते 8 जणांचा दुर्देवाने मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

Updated: Apr 16, 2023, 10:18 PM IST
Kharghar Heat stroke: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास, 7 ते 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती! title=
maharastra bhushan, Heat stroke,CM eknath Shinde

Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भर उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा (Heat stroke) त्रास झाला. जवळपास 500 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उष्माघाताने 7 ते 8 जणांचा दुर्देवाने मृत्यू ( Death due to heatstroke) झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली.

काय म्हणाले Eknath Shinde ?

मी डॉक्टरांना भेटलो आणि त्यांच्याशी या विषयी बोललो. अनेक लोकांना उष्माघातामुळे त्रास झाला आहे. झालेली ही दुख:द घटना आहे, मनाला वेदना देणारी घटना आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी घोषित केलं.

रुग्णांना चांगल्यात चांगलं उपचार दिलं जावं, यासाठी सुचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 5 लाख देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या घटनेमध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. पनवेलचे उच्च दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. एकूण जवळपास 24 लोकांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, खारघर येथील मैदानावर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राज्यात सध्या  पारा 40 अंश सेल्सियसच्या वर आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर उपस्थितांपैकी काहींना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर अतिउष्णतेमुळे काही नागरीक आजारी पडले. उन्हाचा तडाखा बसल्यानं काही नागरिकांना चक्कर आली.