Mahindra And Mahindra Factory In Pune: ज्येष्ठ उद्योजक आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा कंपनीने पुण्यातील चाकणमध्ये नवीन कारखाना उभारला आहे. या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरी तयार केल्या जाणार आहेत. या कारखान्यात इलेक्ट्रीक बॅटरी असेम्बली सेटअप तयार करण्यात आला असून जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्टच या कारखान्यातून बाहेर पडतील अशी यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली आहे. हा कारखान्यात नेमकं आहे का पाहूयात...
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिंद्राच्या या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रीक एसयुव्हीमधील ओरिजन सुटे भागही बनवले जातील. चाकणमध्ये आधीपासूनच एसयुव्ही तयार करण्याचा महिंद्राचा कारखाना आहे. हा प्रकल्प भारतामधील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असून त्याचं एकूण क्षेत्रफळ 2.83 स्वेअर किलोमीटर इतकं आहे. हा कारखाना पूर्णपणे पारंपारिक ऊर्जेवर काम करतो.
महिंद्रा ग्रुपकडून एकूण 16 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या निधीचा वापर सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्ट, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान आणि निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी केला जाणार आहे. याच 16 हजार कोटींपैकी 4500 कोटी रुपयांची गुंतवणूक पुण्यातील चाकणमध्ये असलेल्या या नव्या प्रकल्पात केली जाणार असल्याची शक्यता आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीचे कारखाने हे बहुतांशी ऑटोमॅटिक सेटअपमध्ये काम करतात. त्यामुळेच या ठिकाणी लहान मोठे असे एकूण एक हजारांहून अधिक रोबोट्स काम करतील असा अंदाज आहे.
नक्की वाचा >> मंत्रालयातील काळ्या कारचं पनवेलमधील 700 कोटी रुपयांशी कनेक्शन? गूढ वाढलं
महिंद्रा कंपनीच्या ऑटोमेशनबद्दल बोलायचं झाल्यास या कारखान्यामध्ये पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रेस शॉपबरोबरच एआयवर काम करणारे बॉडी शॉप आणि पेटींगसाठी रोबोट्सची मदत घेतली जाणार आहे. या माध्यमातून काम अधिक परिणामकारक आणि दर्जेदार होईल याकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. या कारखान्यामध्ये एका वेळेस 500 रोबोट कारखाना कार्यान्वयित करण्यात आला आहे. हे रोबोट बॉडी शॉप मॉनेटरिंग करतील. या कारखान्यामध्ये 4.0 जनरेशनचं तंत्रज्ञान अशणार आहे. यात ऑटोनॉमस मोबाईल रोबोट्स आणि ओटोमेटेड गाईडेड व्हेईकर्सचा समावेश असेल. या यंत्रणांच्या मदतीने कारखान्यातील अवजड सामान आणि कारचे भाग सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतील. जगातील सर्वात आधुनिक कार बॅटरी तयार करणारं तंत्रज्ञान आणि मशीन या ठिकाणी वापरल्या जाणार आहेत.
या कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या प्रोडक्टच्या चाचणीची सोयही असणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रोडक्ट वापरताना येणाऱ्या अडचणींची प्रात्यक्षिकं स्टिम्युलेशनच्या माध्यमातून प्रोडक्ट्सवर आजमावून पाहिली जाणार आहेत. या ठिकाणी रिअल टाइम तापमान तपासणीही केली जाणार आहे. दर्जेदार प्रोडक्टच कंपनीमधून बाहेर पडेल याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे.