नाशिक : मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. आजच्या घडीला एकट्या मालेगावात कोरोनाचे तब्बल ३० रुग्ण आहेत. मालेगावकरांना लॉकडाऊन, संचारबंदी मंजूर नाही अशी स्थिती आहे. यामुळं एका दिवसात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.
BreakingNews । नाशिकमधील मालेगावमध्ये कोरोनाचा तिसरा बळी ।दोन्ही महिला संशयित ,अहवाल प्रतीक्षेत । मालेगावच्या सामान्य रुगणलयात मृत्यू ।दोन्ही महिलांचे वय साधारण ५० वर्षे#CoronaVirus @CMOMaharashtra @ashish_jadhao #CoronaInMaharashtra
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 14, 2020
मालेगावकरांमुळे एका दिवसात नाशिक जिल्हा कोरोनाच्या ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये गेला. मालेगावात कोरोना वेगानं पसरला. याला दुसरं तीसरं कोणीही जबाबदार नसून खुद्द मालेगावकरच कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार आहेत. देशात लॉकडाऊन आणि राज्यात संचारबंदी असतानाही मालेगावमधे मात्र सर्व जनजीवन सुरळीत होतं. बाजारपेठेत गर्दी होती. धार्मिक स्थळी सामूहिक प्रार्थना सुरु होती. कोरोना ही प्रेशिताचीच देणगी असल्याचा संदेश कुणीतरी मालेगावकरांमध्ये पसरवला आहे.
BreakingNews । नाशिक जिल्हयातील कोरोनाचा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा । लासलगाव परिसरात पिंपळगाव नजीक गावातला हा रुग्ण । त्याचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह । सकाळी ११ वाजता मिळणार डिस्चार्ज । त्यामुळे नाशिक शहरात संख्या केवळ तीन#CoronaVirus @CMOMaharashtra @ashish_jadhao #CoronaI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 14, 2020
मालेगावकरांना जणू कायदा नियम काही मंजूर नाही अशी स्थिती आजही आहे. ते पोलिसांनाही घाबरत नाही. पण कोणालाच न जुमानणाऱ्या या नागरिकांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोरोनाचा फैलाव रोखणे कठिण होणार आहे.