मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला

मनोज जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. जरांगेविरोधात ओबीसींनी मोर्चा काढला असून जरांगे पाटलांवर कारवाईची मागणी केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 6, 2025, 10:48 PM IST
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला title=

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून राज्यभरात मोर्चे सुरू आहेत. मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होतायत.. मात्र यातून ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय.. त्यामुळे मनोज जरांगेंच्या विधानाविरोधात ओबीसी समाजानेही आंदोलनं करायला सुरूवात झालीय.

मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये केलेल्या या वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय.. संतोष देशमुखांच्या समर्थनार्थ परभणीत काढलेल्या मोर्चात जरांगे पाटलांनी वंजारी समाजाला  टार्गेट केल्याचा आरोप होतो.. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते आक्रमक झालेत.. ठाण्यात वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

छत्रपती संभाजीनगरातही येत्या 8 तारखेला याच मुद्द्यावर ओबीसी समाजाने आंदोलनाची तयारी सुरू केलीय..ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय..
धनंजय मुंडे गुंडांच्या टोळ्या पाळताहेत. ते जातीयवाद करत असल्याचा प्रतिहल्ली जरांगे पाटलांनी केलाय.संतोष देशमुख यांना न्याय मिळणं गरजेचं आहे.. त्यामुळे या प्रकरणाला कुणीही जातीचं वळण देऊ नये असं आवाहन दोन्हीकडच्या नेत्यांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलीय. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर न्यायासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. पाठोपाठ ओबीसी समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप करीत आता ओबीसी ही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.. या सगळ्यात संतोष देशमुखांच्या न्यायाचा विषय बाजुला जाऊन जातीय राजकारण रंगायला नकोच एवढीच माफक अपेक्षा.