नागपूर : नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी कुठल्याच पालिकेत नकोत अशी भूमिका महापौर परिषदेत राज्यातल्या महापौरांनी घेतल्याची चर्चा आहे. आयुक्त मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या कुठल्याही पालिकेत नियुक्ती देण्यात येऊ नये असा ठराव महापौर परिषदेत मांडण्यात आला आणि तो पारित करण्यात आला अशी चर्चा सध्या रंगते आहे.
मात्र असा कुठलाही ठराव आलाच नसल्याचं मुंबईचे महापौर आणि या महापौर परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलं आहे. शनिवारी नागपुरात महापौर परिषदेची अठरावी सभा आयोजित करण्यात होती. या परिषदेला राज्यातल्या १९ महापौरांनी हजेरी लावली होती.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी झी २४ तासला दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिली आहे.