विद्यार्थ्यांनो तयारीला लागा.... MBA प्रवेशासंदर्भात मोठी बातमी!

व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी द्यावी लागणाऱ्या राज्यस्तरीय पदव्युत्तर पदवीची प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर होऊनदेखील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे.

Updated: Oct 7, 2022, 12:21 PM IST
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा.... MBA प्रवेशासंदर्भात मोठी बातमी!  title=

MBA Admission Process 2022 : व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी द्यावी लागणाऱ्या राज्यस्तरीय पदव्युत्तर पदवीची प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर होऊनदेखील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. गेल्या महिन्यात (सप्टेंबरमध्ये) राज्यस्तरीय एमबीए सीईटीचा निकाल सीईटी सेलने जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सुर ऐकायला मिळतोय. प्रवेश प्रक्रियेचा सुरु असलेला विलंब कशासाठी होतोय ? असा प्रश्न विद्यार्थीं आणि पालकांकडून केला जातोय.

राज्यस्तरीय एमबीए सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील 1 लाख 30 हजार 740 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. एमबीए सीईटीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवासांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणं अपेक्षित होतं. पण, निकाल जाहीर होऊन तब्बल 1 महिना होत आला तरी देखील व्यवस्थेकडून या संबंधीत कोणतंही पाऊल पडलेलं दिसत नाहीये. यामुळे जवळपास 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश परिक्षेची वाट पाहत आहेत.

निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रवेश प्रक्रिया किती दिवस चालणार? अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरु झाली नाही तर कॉलेज मिळाल्यानंतर वर्ग कधी भरणार? एकीकडे सरकारकडून प्रवेश प्रक्रिया रखडली आहे आणि दुसरीकडे खासगी विद्यापिठांमध्ये मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थ्यांचे वर्ग देखील सुरु झाले आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे. 

'व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (MBA) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नोंदणी प्रक्रिया आजपासून (10 ऑक्टोबर) सुरु होत असल्याचं राज्याच्या सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी सांगितलं आहे.