अमरावती : अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना न्यायालयानं एक वर्षाची शिक्षा सुनावन्यात आली आहे. वाहतूक पोलिसाला केलेली मारहाण बच्चू कडूंना भोवली.
दोन वर्षांपूर्वी परतवाडा बस स्थानक परिसरात आमदार बच्चू कडू आणि एका वाहतूक पोलिसात बाचाबाची झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसानं बच्चू कडूंविरोधात मारहाण केल्याची तक्रार नोंदवली होती. त्याच खटल्याबाबत अचलपूर सत्र न्यायालयानं कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावलीय.