पाणी प्यायल्याला गेलेल्या माकडाचं तोंंड पाण्याच्या भांड्यात अडकलंं...

 

Updated: May 20, 2018, 06:20 PM IST

 

यवतमाळ :  पाणीटंचाईमुळे यवतमाळ जिल्ह्यात माणसांबरोबर प्राण्यांवरही संक्रांत आली आहे.  दिग्रस मध्ये  तर तहानेने व्याकुळ झालेल्या  माकडाच्या पिल्लाच्या डोक्यात गडवा अडकला.

कुठे घडला हा प्रकार? 

 दिग्रसमधल्या होलटेकपुरा परिसरात माकडाचे एक कळप आला होता.... त्यातल्या एका पिल्ल्ाला एका घऱोसमोर पाण्यानं भरलेला तांब्या किंवा गडवा दिसला..... पाणी पिण्यासाठी पिल्लानं डोकं आत घातल्यावर त्याचं डोकं अडकलं. डोक्यात गडवा अडकल्यानं माकडाचं पिल्लू सैरभैर झालं.... माकडीणही हा गडवा काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला..... इतर माकडांनीही तिला मदत केली, पण तो गडवा काही निघाला नाही.... माकडीण त्या पिल्लाला घेऊन झाडावर पळून गेली. 

 वनविभागाने केली मदत 

 या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचं पथक आणि प्राणीमित्रांनी मदतीसाठी प्रयत्न सुरु केले. या प्रकारामुळे झालेल्या गर्दीत माकडीण आणखीनंच गोंधळून गेली होती. भेदरलेली माकडीण झाडांवरुन आणि घरांवरुन उड्या मारत होती. अखेर माकडीणीला इंजेक्शनच्या मदतीनं बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर माकडाच्या पिल्लाच्या डोक्यातून गडवा काढण्यात आला. आणि सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.