नागपुरात वॉटरपार्कमध्ये बुडून दोघांंचा मृत्यू

  उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी रिसॉर्ट्स, वॉटरपार्कला सहलींचं आयोजन करतात. 

Updated: May 20, 2018, 05:31 PM IST

 

नागपूर :  उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी रिसॉर्ट्स, वॉटरपार्कला सहलींचं आयोजन करतात. मात्र पुरेशी काळजी आणि सुरक्षा न पाहिल्यास अशा सहली जीवावर बेतू शकतात. असाच एक दुर्दैवी प्रकार नागपुरात घडला आहे. नागपुरात वॉटर पार्क मध्ये बुडून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कुठे घडला हा प्रकार ? 

 Crazy castel water park मध्ये बुडून दोन युवकांचा  मृत्यू झाला आहे. यामधील मृतांची नावं सागर सहस्त्रबुद्धे (21 वर्ष) आणि अक्षय बिंड (19 वर्ष ) आहे. तर नेहल मोटघरे 21 वर्ष हा युवक अत्यवस्थ  आहे. ही घटना दुपारी दीडच्या दरम्यान घडली आहे. नागपुरातील या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस तपास सुरू आहे.