31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार

31 डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार आहेत. यामुळे मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 26, 2024, 07:42 PM IST
31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार title=

 Mumbai Local Special Train For 31 December 2024 : थर्टीफस्टच्या दिवशी मुंबईत वेगळीच धूम पहायला मिळते. जुन्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकर घरबाहेर पडतात. मात्र, मध्यरात्री लोकल बंद होत असल्याने सकाळच्या पहिल्या लोकल वाट पाहत थांबवे लागते. यंदा मात्र,  31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे. कारण  31 डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  

नववर्षांच्या स्वागताला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अतिरिक्त लोकल धावणार आहेत. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मुंबईत चालणार 12 अतिरिक्त लोकल सोडल्या जाणार आहेत.  31 डिसेंबरच्या रात्रीपासून 1 जानेवारी पहाटेपर्यंत अतिरिक्त लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर 8 अतिरिक्त लोकल  चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत. तर मध्य रेल्वेवर 4 अतिरिक्त लोकल धावमार आहेत.  छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण आणि पनवेल अशा या स्पेशल ट्रेन असणार आहेत. 

पश्चिम रेल्वेच्या 31 डिसेंबरला सुटणाऱ्या विशेष लोकल

विशेष ट्रेन चर्चगेट येथून मध्यरात्री 01.15 वाजता सुटेल आणि विरारला पहाटे 02.55 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन चर्चगेट येथूनमध्यरात्री 02.00 वाजता सुटेल आणि विरारला पहाटे 03.40 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन चर्चगेट येथून पहाटे 02.30 वाजता सुटेल आणि 04.10 वाजता विरारला पोहोचेल.
विशेष ट्रेन चर्चगेट येथून पहाटे 03.25 वाजता सुटेल आणि विरारला 05.05 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन 00.15 वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला 01.52 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन मध्यरात्री 00.45 वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला 02.22 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन मध्यरात्री 01.40 वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला 03.17 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन मध्यरात्री 03.05 वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला 04.41 वाजता पोहोचेल.

मध्य रेल्वेच्या 31 डिसेंबरला सुटणाऱ्या विशेष लोकल

विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 01.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे 03.00 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन कल्याण येथून  मध्यरात्री 01.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 03.00 वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 01.30 वाजता सुटेल आणि पहाटे 02.50 वाजता पनवेलला पोहोचेल.
विशेष ट्रेन पनवेल येथून  मध्यरात्री 01.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 02.50 वाजता पोहोचेल