नाशिक : CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in Nashik) कमी झाल्याने शिथिलता आणली गेली आहे. मात्र, या लोक जास्तच गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्याने नाशिक शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल हॉटेल्समध्ये नागरिक मुक्तपणे वावरत आहेत. वाढणारी गर्दी बघता नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) मास्क (Mask) लावण्याचे निर्बंध जारी केलेत. आजपासून मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंड केला जाण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही खास मोहीम सुरू केली आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन आठवड्यापूर्वी कोरोना साथीमुळे बाधित संख्येने शतकी आकडा ओलांडला होता. सोळा दिवसांच्या शंभरीतील रुग्णसंख्या पार करत चोवीस तासांमध्ये 129 कोरोना बाधित संख्या समोर आली होती. यापूर्वी 29 सप्टेंबरला 24 तासात 155 बाधित झाले होते. सर्वाधिक बारीक होण्याचे प्रमाण नाशिक ग्रामीणमध्ये दिसून येत आहे.
नाशिकच्या काही तालुक्यांत 84 जण बाधित झाल्याचे आढळून आले होते तर नाशिक शहरात 40 संख्या पोहोचली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे सोशल डिस्टंट, साबणाने सातत्याने हात स्वच्छ धुणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे, असे नाशिक महापालिकेने आवाहन केले आहे. तरच तिसऱ्या लाटेपासूनचा धोका टळेल, असे म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात काल 2536 रुग्ण बरे झालेत. तर आतापर्यंत 6443342 कोरोनाचे रुग्ण ठणठणीत झालेत. राज्यात 19480 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 16 हजार 156 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 733 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. सध्या देशात 1 लाख 60 हजार 989 सक्रीय रुग्ण आहेत.