योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील निरीक्षण गृहातून नऊ अल्पवयीन मुलं पसार झाली आहेत. गज तोडून ही मुलं पळून गेली आहेत. आतापर्यंत अशा निरीक्षणगृहांमधून पन्नासपेक्षा अधिक मुलं आणि महिला पळून गेल्यात. मात्र पूर्वीच्या उदाहरणांमधून प्रशासन कुठलाही धडा घेताना दिसत नाही.
पळून गेलेल्या मुलांवर गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत, उंच भिंती आणि मजबूत खिडकीचे गज कापून ही मुले पसार झाली आहेत. मात्र या मुलांचा उपद्रव आता नाशिक शहरात दिसून येत आहे, यामुळे गुन्हेगारीत वाढ झाल्याचंही बोललं जात आहे. नाशिक पोलिसांसमोर या मुलांना पकडणे आणि त्यांचा उच्छाद थांबवणे हे एक आव्हान उभं ठाकलं आहे.