अलिबाग : तालुक्यातील किहीम येथील नीरव मोदी यांचा आलिशान बंगला, महेंद्र रेस्ट्रॉन व स्कॉर्पियो या दोन गाड्या व सर्व मालमत्ता मुबंई येथील सीबीआय टीमने जप्त केली आहे.
मुबई येथून ५ ते ६ जणांची सीबीआयची टीम दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास नीरव मोदी यांच्या फार्महाऊस वर दाखल झाले होते. सीबीआयमार्फत ११ तासाच्या कारवाईनंतर ११.३० वाजता हे पथक फार्म हाऊसच्या बाहेर पडले.
सीबीआयने नीरव मोदी यांच्या फार्महाऊसवर केलेल्या कारवाईत महेंद्र कंपनीची रेस्ट्रॉन गाडी साधारण किंमत २७ लाख एवढी आहे तर स्कॉर्पियोची १० लाख किंमत आहे.
नीरव मोदी याची किहीम येथे पावणे दोन एकरमध्ये मालमत्ता असून यात पावणे चार गुंठ्यामध्ये बंगला आणि नारळ, आंब्याची झाडे अशी पावणे चार कोटींची मालमत्ता सीबीआयने जप्त केली आहे.