मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश राणे यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार असल्याच दिसत आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. पण त्यांचा मुक्काम वाढणार अस दिसत आहे.
आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालायत सुनावणी होणार होती. दुपारी दोननंतर सुनावणी होण्याची शक्यता होती. पण, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा आहे. यामुळे आज न्यायालय बंद असल्यामुळे सुनावणी होणार नाही.
नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. आज सुट्टी असल्याने त्यांचा मुक्काम पुन्हा वाढला.
सरकारी वकिलामार्फत जिल्हा न्यायालयात अर्ज म्हणणं मांडायला पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी भूमिका सरकारी वकीलांनी मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी केली. त्याचवेळी सरकारी वकील यांनी आमदार नितेश राणे यानी सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे याच्या समोर नको, अशी मागणी केली.
तसेच सरकारी वकीलांचे म्हणणे आहे की, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशासमोर सुनावणी सुरु आहे, त्यांच्या समोरच सुनावणी घ्यावी, अशी भूमिका सरकारी वकीलांनी मांडली.
जिल्हा सत्र न्यायाधीश रोटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार नितेश राणे हे शरण आल्यानंतर कस्टडीमध्ये घेतलेले नाही, अशी थेट तक्रार सरकारी वकिलांनी केली आहे.