ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठीचं अधिकाऱ्यांची आकडे टाकून वीजेची चोरी

ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी अधिका-यांनाच वीज चोरी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झाला. हा प्रकार प्रसार माध्यमांच्या लक्षात आल्यावर सारवासारव करताना या अधिका-यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले. मग केवळ अतिरिक्त कनेक्शन असल्याचा केविलवाणा दावा अधिका-यांनी केला.

Updated: Sep 13, 2017, 05:32 PM IST
ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठीचं अधिकाऱ्यांची आकडे टाकून वीजेची चोरी title=

योगेश खरे, ​नाशिक : ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी अधिका-यांनाच वीज चोरी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झाला. हा प्रकार प्रसार माध्यमांच्या लक्षात आल्यावर सारवासारव करताना या अधिका-यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले. मग केवळ अतिरिक्त कनेक्शन असल्याचा केविलवाणा दावा अधिका-यांनी केला.

विजेच्या तारांवर आकडे पाहून तुम्ही धास्तावला असता. दिवसाढवळ्या ही वीजचोरी सुरु होती. वीजचोरीची दृष्य ग्रामीण भागाला काही नवी नाहीत. पण ही वीजचोरी सुरु होती ती खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री चंदरशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमात  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमातच हा सगळा वीजचोरीचा प्रकार घडला. ज्यांनी वीज चोरी थांबवायला हवी, त्या अधिका-यांनीच हे विजेचे आकडे टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

झी २४ तासच्या प्रतिनिधींच्या लक्षात हा प्रकार आल्यावर अधिका-यांची एकळ पळापळ झाली. काही अधिका-यांनी तर हे अतिरिक्त कनेक्शन असल्याचा दावा करुन या प्रकरणात सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. तर दुसरीकडे तझालेली चूक झाकण्यासाठी तातडीने मीटर जोडण्याचा प्रकारही सुरु झाला.

ऊर्जामंत्र्यांचा कार्यक्रम वीज ग्राहकांशी थेट चर्चा करण्याचा होता. वीजचोरी टाळण्याचाही मुद्दा या चर्चेत महत्त्वाचा होता. जिथे वीजचोरी घडू नये, अशी चर्चा सगांभिर्याने सुरु होती, तिथेच दुसरीकडे हा वीजचोरीचा प्रकार सर्रास सुरु होता. या प्रकारात जर काही अपघात झाला असता, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती, या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं. आता या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई ऊर्जामंत्री करणार का, हे पहावं लागेल.