Onion Market Price: कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं असा प्रश्न राज्यातील विविध बाजार समितीत शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी लिलाव बंद केला होता. दरम्यान आज प्रत्यक्ष लिलावाला सुरुवात झाल्यानंतर खूपच कमी भाव मिळाला. त्यात नाफेडचा एकही अधिकारी बाजार समितीमध्ये खरेदीसाठी न आल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संतप्त झाला आहे.
पिंपळगावात कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव घसरल्यानं शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी लिलाव बंद पाडले. केंद्र सरकारनं नाफेडचा भाव 2410 रुपये जाहीर केलेला असताना बाजार समितीत मात्र भाव पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे नाफेडप्रमाणे 2410 रुपयांनी खरेदी करावी अशी मागणी शेतक-यांनी केलीय.
निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून लासलगाव से नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी नाफेड मार्फत खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली मात्र आज कांद्याचे लिलाव सुरू होतात चांगल्या कांद्याला पंधराशे ते 2100 रुपये इतका सरासरी बाजार भाव मिळत असताना नाफेडचा एकही अधिकारी बाजार समितीमध्ये खरेदीसाठी न आल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाफेड चा अधिकारी कोठे आहे अशी विचारणा करत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले
निर्यात शुल्क रद्द करण्याचा मागणीसाठी बंद करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये आज चौथ्या दिवशी कांद्याचे लिलाव सुरू होताच मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.लिलाव बंद झाले त्यादिवशी साधारण 2400 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल कांद्याचे भाव होते. ते भाव आज 2000 ते 2100 पर्यंत भाव खाली उतरले आणि सर्वधारण कांद्याच्या भावातही प्रचंड घसरण पाहायला मिळाली.
आज चौथ्या दिवशी मनमाड बाजार समितीमध्ये सुमारे 150 वाहनांची आवक झाली होती.निर्यात शुल्क रद्द करण्याचा मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही उलट भावात घसरण झाली . केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला भाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
गेल्या तीन दिवसापासून कांदा लिलाव हे बंद होते मात्र आज सर्वत्र कांदा लिलाव सुरू झाले असताना येवला बाजार समितीमध्ये कांदा लिलाव पुकारण्यास सुरुवात होताच मिळणाऱ्या भावांमध्ये शेतकरी समाधानी नसल्याने संतक्त शेतकऱ्यांनी येवल्यात कांदा लिलाव बंद पाडला. कांद्याला सरासरी १९०० ते २ हजार रुपये भाव पुकारल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत हा कांदा लिलाव बंद पाडत नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला.