मोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी

शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.

Updated: Mar 12, 2018, 03:32 PM IST
मोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी title=

पनवेल : शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.

पनवेलमधल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी, २७ हजार चपात्या, साडे पाचशे जवळा, कांदा आणि लोणचं  पाठवलंय. पनवेल  आणि उरण तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षानं त्यासाठी पुढाकार घेतला आणि शेतक-यांसाठी भाक-या पाठवण्याचं आवाहन केलं.