कैलास पुरी/ पिंपरी चिंचवड : तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेला तर राईस प्लेटचा खर्च किती येतो 50 रुपये फार फार तर 60 रुपये. पण पिंपरीमध्ये मात्र माणसाच्या जेवणापेक्षा उंदराची किंमत जास्त आहे...! इथं सापाला खायला लागणारा एक उंदीर तब्बल 138 रुपयांना खरेदी केला जातो! काय आहे हा प्रकार पाहुयात एक रिपोर्ट
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानामध्ये विविध जातीचे जवळपास 100 हून अधिक साप आहेत. त्यांच्या साठी किमान 10 दिवसातून एकदा प्रत्येकी एक उंदीर खाण्यासाठी आणला जातो..! आता या एका उंदराची महापालिका किती रुपये मोजत असेल असं आपल्याला वाटते...! तब्बल 138 रुपये.
याच सर्पोद्यानात काही वर्षांपूर्वी एक उंदीर अवघ्या 75 पैशांना खरेदी केला जात होता. विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण उघड केलंय महापालिकेमध्ये सर्प मित्र म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने...या संबंधी चौकशी करण्याची मागणी त्याने केलीय...!
दुसरीकडे महापालिका प्रशासनाने 138 रुपयांना एक उंदीर खरेदी केला जात असल्याचे मान्य केलंय पण कॅमेऱ्यावर बोलायला तयार नाहीत...तर आयुक्त श्रावण हर्डीकर गुजरात दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचे ही मत समोर आलेल नाही.