घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ!

Sangali Crime News: सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला ठार मारण्यासाठी आरोपींनी रचलेला कट ऐकून पायाखालची जमिनच सरकेल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 4, 2023, 06:12 PM IST
घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ! title=
plot by the accused killing the entire family by giving 11 KV current to the house in sangali

सरफराज सनदी, झी मीडिया

Sangali Crime News:  घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणामुळं गावात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (San

संपूर्ण घराला ११ केव्हीचा करंट देऊन कुटूंबाला जीवे मारण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र एकाच वेळी ११ केव्ही विजेवर करंट दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीची संपूर्ण गावाची वीजच बंद पडल्यामुळे सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले आहे. गावातील निकम कुटुंबाबाबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

काय घडलं नेमकं?

रात्री सगळे साखरझोपेत असताना अचानकपणे एक वाजण्याच्या सुमारास विद्युत ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट झाला. त्यानंतर सर्व वीज गेले. निकम कुटुंबीयांना घराजवळच असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळं काहीतरी झाले असेल असं समजून निकम कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण पुन्हा ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटाचा आवाज आला त्यावेळी निकम कुटुंबीय खडबडून जागे झाले. 

नक्की काय झाले हे पाहण्यासाठी ते बाहेर आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की समोरच्या ट्रान्सफॉर्मरवर अनेक वायर लटकत असल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी अज्ञात लोक दोरीच्या सहाय्याने विजेच्या तारा घराजवळ ओढून टाकत असल्याचं पाहायला मिळाले. पण त्याचवेळी निकम कुटुंबीय जागे झाले असून घराजवळ उभे आहेत ही आरोपींच्या लक्षात आले. त्यानंतर अज्ञातांनी तिथून पलायन केलं.

दरवाजाजवळ विद्युत तारा लावल्या

घराजवळ अज्ञात लोक दिसल्याने निकम कुटुंबीयांना थोडा संशय आला. तेव्हा त्यांना काही तर घडत असल्याचं लक्षात आलं. यावेळी सजगपणे त्यांनी घराच्या आजूबाजूला पाहणी केली. तेव्हा घराच्या दोन्ही बाजूच्या दरवाजांना विद्युत तारा लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे काबी तरी भयंकर असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा विचार केला.  या प्रकरणी सुरज निकम यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यामध्ये कुटुंबाला जीव मारण्याच्या प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. तर बाबतचा तपास सुरू असल्याचं चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे. दरम्यान या मागे नक्की कोण सूत्रधार आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये.