पोलीस हवालदाराच्या आवाजाची सोशल मीडियावर जादू

ल पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं त्यांच्या शर्टला असणाऱ्या नंबर प्लेटवरून लक्षात येतं आहे

Updated: Feb 25, 2020, 03:59 PM IST
पोलीस हवालदाराच्या आवाजाची सोशल मीडियावर जादू title=

पुणे : पोलीस हवालदार सागर घोरपडे यांच्या आवाजाची सध्या सोशल मीडियावर जादू आहे. सागर घोरपडे यांचा आवाज ऐकल्यावर तुम्ही एखाद्या कसलेल्या गायकाचं गाणं ऐकत असल्यासारखं वाटेल. सागर घोरपडे यांची काही गाणी यापूर्वी देखील गाजलेली आहेत.  पण काही दिवसानंतर सागर घोरपडे यांच्या आवाजात आणखी मोठा बदल झाला आहे. 

यावरून सागर घोरपडे लवकरच एक गायक म्हणून आपली घौडदौड सुरू करतील हे नक्की. सागर घोरपडे हे पुणे शहरातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं त्यांच्या शर्टला असणाऱ्या नंबर प्लेटवरून लक्षात येतं आहे. तेरा बन जाऊंगा हे मुळात कबीर खान यांनी गायलेलं गाणं, सागर घोरपडे यांनी गायलं आहे.