Pune Crime: अपघात, अपहरण अशा गुन्हेगारीच्या बातम्यांमुळे पुणे जिल्हा सध्या चर्चेत आहे. हिट अॅण्ड रनच्या अनेक घटना पुण्यात काही दिवसांपासून समोर येतायत. त्यात कोयता गॅंग, गुन्हेगारी टोळ्यादेखील डोके वर काढू लागल्या आहेत. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे 3 तरुण आणि एका महिलेचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.
दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानी शनिवारी या चौंघाचे अपहरण केले. आणि त्यांना अमानुषपणे मारहाण केली. कोयता, लाठ्या काठ्यांनी या चौघांना मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर हात पाय बांधून उलटे लटकवण्यात आले. ही घटना व्हिडीओमध्ये कैद करण्यात आली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.त्यामुळे जनतेकडून संताप व्यक्त केला जातोय. यानंतर महाराष्ट्राचा बिहार झालाय का? असा प्रश्न नागरिक विचारतायत.
अपहरण झालेले हे तरूण शिक्रापुर येथील रहिवासी आहेत. पैशाच्या वादातून त्यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपहरण करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या नात्यातीलच असल्याचे सांगितले जातेय.
पैशाचा वाद होता तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देणे गरजेचं होत. पण त्यांनी तसं न करता चौघांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. यामुळे आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न या निमित्ताने प्रश्न उभा राहतोय.
या प्रकारानंतर मारहाण झालेल्या तरूणांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिक्रापूर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा ताखल केला आहे. आता आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिक्रापुर पोलिसांनी दिली आहे.