पुणे : समर कॅम्प साठी आलेली ३ मुलं धरणात बुडाल्याची घटना मुळशी तालुक्यात घडलीय. यातील तीनही मुलांचे मृतदेह सापडल्याचे वृत्त हाती आले आहे. चेन्नईतील ECS matriculation school ची १३ ते १५ वयोगटातील २० मुलं मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये समर कॅम्प साठी आली होती. आज त्यांच्या कॅम्पचा पहिलाच दिवस होता. संध्याकाळच्या वेळी ३ मुलं खातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही. दानिश राजा, संतोष के आणि सर्वांना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. त्यांचा पाण्यात शोध घेतला असता दानिशचा मृतदेह सापडला. उद्या सकाळी शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. उन्हाळी किंवा सुट्टीतील शिबिरांमधील सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा समोर आलाय.