Pune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!

Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

सौरभ तळेकर | Updated: Dec 17, 2023, 07:46 PM IST
Pune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ! title=
Pune Fire, Sawai Gandharva Mahotsav

Pune Fire At Sawai Gandharva Mahotsav : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नसल्याचं समोर आलंय. आग छोट्या स्वरूपाची असल्यानं कुठलेही नुकसान नाही. रंगमंचाच्या मागे असणाऱ्या एका खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आयोजकांना यश आलं. पण अचानक आग लागल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी धावपळ उडाली होती. पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण आता सर्व काही सुरळीत सुरू असल्याची आयोजकांची माहिती दिली आहे.

पुणे आणि परिसरातल्या शास्त्रीय संगीतरसिकांसाठी वार्षिक पर्वणी असणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सध्या पुण्यात सुरू आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी महोत्सवाला भेट दिली होती. त्याचबरोबर अनेक कलाकारांनी देखील महोत्सवात सहभागी होऊन काम मंत्रमुग्ध केले आहेत.

‘सवाई’च्या पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या रससिद्धा स्वराविष्काराने झाली. 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात संपन्न होत आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवशीची स्वरसंध्या शनिवारी सजली. प्राजक्ता मराठे यांनी आजोबा राम मराठे यांना केलेले स्वराभिवादन आणि देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार यांच्या गायन व सतार वादनानंतर यामिनी रेड्डी यांच्या कुचिपुडी नृत्याविष्काराने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 

आणखी वाचा - नागपुरात सोलार कंपनीत मोठा स्फोट; नऊ कामगारांचा भीषण मृत्यू, अपघाताचे कारण समोर

दरम्यान, कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवलं होतं. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना यावर्षीच्या वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.