पुणे : पुण्यातील १७ वर्षांची मुलगी श्रुती बाबूराव नरे हीन आपल्या छोट्याशा आयुष्यानंतर ६ जणांना जीवनदान दिलं आहे. याबाबतीत सर्वात महत्त्वाचा ठरला आहे, तिच्या आईवडिलांचा निर्णय. श्रुती आज जगात नसली, तरीही देखील ती ६ जणांसाठी जगतेय, ६ जणांना ती जीवनदान देऊन गेली आहे, असंच म्हणता येईल. श्रुतीच्या आईवडिलांना श्रुतीचं जाण्याचं दु:ख हलकं करण्यासाठी ही बाब दिलासा देणारी ठरतीय. आपल्या मुलीने आणि पालक म्हणून योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे ६ जणांना जीवदान मोठं समाधान त्यांना आहे. यामुळे आपली श्रुती आजही जिवंत असल्याची त्यांची भावना आहे.
खरंतर श्रुती आणि तिच्या आईवडिलांवर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये. श्रुती ही हसतखेळत राहणारी मुलगी होती. श्रुतीचे अचानक डोकंदुखू लागलं. एकेदिवशी तर डोकेदुखीमुळे ती अचानक खाली कोसळली. यानंतर तिला काही वेळेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण ती कोमात गेली.
डॉक्टरांनी पुढील तपासण्या आणि उपचार केल्यावर सांगितलं, श्रुतीचा ब्रेनडेड झाला आहे. यानंतर अचानक आलेल्या दु:खात बुडालेल्या तिच्या पालकांना विश्वासात घेण्याची हिंमत डॉक्टरांनी दाखवली. यानंतर श्रुतीच्या अवयवदानाचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला. यामुळे ६ जणांना जीवनदान मिळालं आहे.
श्रुती या वयात गेली, अचानक गेली हे तिच्या पालकांसाठी पचवणे खूप कठीण आहे, पण यात दिलासा म्हणून आपल्या इवल्याशा जीवाने ६ जणांना जीवदान दिलं ही बाब ही त्यांना दिलासा देणारी आहे.