Kirit Somaiya on Thackeray family : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपत्ती घेतली आहे. (Maharashtra Political News) या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी केला आहे. (BJP leader Kirit Somaiya alleges against the Thackeray family) कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात आता अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, FIRमध्ये ठाकरे कुटुंबीयांचे नाव नसल्याचे पुढे आले आहे.
कोर्लईतील 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल झाला आहे. ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल रात्री रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 26, IPC Sections 420, 465, 466, 468 आणि 34 नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्यांविरुद्ध फसवणूक, संगनमत केल्याने 19 बंगल्याच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, अशी तक्रार रेवदंडा पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे. अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.