रायगड : जिल्ह्यात पुढच्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात ४ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सावित्री, कुंडलिका आणि आंबा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
कुंडलिका नदीनं गेल्या तीन दिवसांत दोन वेळा धोक्याची पातळी ओलांडली आहे. अलिबाग, पेण, महाड, माणगाव , उरण, पोलादपूर या तालुक्यांना पावसानं झोडपलं आहे. प्रशासन पूर्णतः दक्ष असून महसूल विभागासह पूर नियंत्रण कक्ष सर्वत्र संपर्क ठेवून आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.