Raj Thackeray On assembly Election Result : मनसेच्या वतीने मुंबई विविध ठिकानी कोकण महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. आज परळ आणि काळाचौकी येथे आयोजित कोकण महोत्सवाला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिली. काळाचौकी येथे राज ठाकरे यांनी उपस्थितांसमोर थोडक्यात मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरे यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर (Assembly Election Result) भाष्य केलं. चार राज्यांच्या विधानसभेचा निकाल समोर आल्यानंतर भाजपला घवघवीत यश मिळालं आहे तर काँग्रेसला फक्त तेलंगाणामध्ये बाजी मारता आलीये. त्यावर आता राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय.
मी लहानपणापासूम इथे अनेकदा येत असतो. आज सुद्धा आलो तसेच या ठिकाणी मटणाचा वेगवेगळा प्रकारच्या सुगंध आला. हे असले जत्रोत्सव हे मराठी माणसाचे अस्तित्व आहे. बाहेरून कितीही आले तरीही तुमचे हे रक्त मराठी भागात असेच सळसळते राहिले पाहिजे. तुम्ही मालक आहात आणि बाकीचे आलेले भाडेकरू आहेत हे लक्षात ठेवा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तुमचा हक्क घालवू नका. अभिमानाने ताठ मानेने येथे राहिले पाहिजे. तुमच्या तक्रारी तिथून झाल्या पाहिजेत की हे आम्हाला त्रास देतात. लालबाग परळ शिवडी हा भाग माझ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर आजही जातो, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
राज ठाकरे बोलत असताना बाजूला ढोल ताशा वाजच होताय. त्यावेळी राज ठाकरे म्हणतात, चार-पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आपल्यासमोर आलेला आहे. विधानसभा निवडणुकांची धामधुमीत महाराष्ट्रात मात्र लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झालीये. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. या ढोल ताशांच्या आवाजापेक्षा माझा ढोल जोरात वाजणार आहे. काही जणांना माझ्या ताशाच्या कानठळ्या बसतील, काही जणांना माझ्या ताशाच्या काठ्या बसतील. काही जणांना माझ्या ढोल ताशाच्या आवाजाचा त्रास होईल, असं म्हणत राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे.