पुणे : सर्जिकल स्ट्राईक ही आव्हानात्मक कामगीरी होती. आम्ही त्यात यश मिळवलं ही मोठी गोष्ट आहे. तरीदेखील लढाई अजून संपलेली नाही. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सेना सदैव सज्ज आहे. असं असताना सर्जिकल स्ट्राईक विषयी शंका उपस्थित होत असेल तर ते फार वेदनादायक असल्याची भावना ले.ज राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केली आहे. ले.ज निंभोरकर यांच्याच नेतृत्वाखाली ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक राबवलं गेलं.
दरम्यान काँग्रेसनं या व्हिडिओ संदर्भात मोदी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडिओ जारी करून मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.