दापोली : तालुक्यातील समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन झालं. लाडघर समुद्रकिनारी हा ऑक्टोपस सापडला. यापूर्वी लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपस कधीही आढळलेला नव्हता.
दोन दिवसांपूर्वीच याच समुद्रकिनारी महाकाय मगरही आढळली होती. तसेच इथे डॉल्फीन माशांचंही अधुमधून दर्शन घडतं. त्यातच आता दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन झाल्यामुळे लाडघर समुद्रकिनारा पुन्हा एकदा चर्चेत आलाय... दापोली शहरापासून 7 कि.मी. अंतरावर लाडघरचा हा समुद्रकिनारा आहे. या किनारी दुर्मिळ ऑक्टोपसचे दर्शन घडल्याने स्थानिक तसेच पर्यटकांसह अनेकांनी ऑक्टोपसला पाहण्याची संधी सोडली नाही. आठ बाहू असणारा ऑक्टोपस हा जलचर प्राणी आहे.
ऑक्टोपस वंशामध्ये एकूण लहान मोठ्या 50 जाती आहेत. त्यामुध्ये लहानात लहान 2.50 सेमी तर मोठ्यात मोठी 9.7 मीटरची प्रजाती आढळते. हा प्राणी विशेषत: खोल समुद्रात राहत असला तरी तो उथळ भागामध्येही राहू शकतो.