रत्नागिरी : नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा थंड्या बस्त्यात गेलेला मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या तारळमध्ये रिफायनरी विरोधी संघटनेने सभा घेतली. मुठभर दलालांसाठी मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प आणू देणार नाही, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
विशेष म्हणजे शिवसेनादेखील या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाली होती. या सभेत पुन्हा एकदा नाणार प्रकल्प नको यासाठी गावागावातून संमतीपत्र गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत नाणारचा मुद्दा कोकणात अग्रस्थानी असेल, असंही ते म्हणाले.