राइस मिल मालकांचा भ्रष्टाचार, ६३ हजार क्विंटल तांदळाचा अपहार

 ९ राइस मिल मालकांनी सुमारे ६३ हजार क्विंटल तांदळाचा अपहार केला आहे. 

Updated: Jun 22, 2018, 08:25 AM IST
राइस मिल मालकांचा भ्रष्टाचार,  ६३ हजार क्विंटल तांदळाचा अपहार title=

भंडारा : पूर्व विदर्भातल्या भंडारा जिल्ह्याची ओळख धानाचे कोठार अशी आहे. मात्र हेच धान काही राइस मिल मालकांना भष्ट्राचारासाठी कुरण ठरत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या ९ राइस मिल मालकांनी सुमारे ६३ हजार क्विंटल तांदळाचा अपहार केला आहे. २०११ - १२ च्या खरीप हंगामामध्ये भंडारा जिल्ह्यातील राइस मिलना धान भरडाईसाठी देण्यात आला. नियमानुसार तयार केलेला ६७ टक्के म्हणजेच सुमारे ६३ हजार क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात जमा करायचा होता. मात्र भंडारा जिल्ह्यातल्या वरठी आणि मोहगावमधल्या ९ राइस मिल मालकांनी या तांदळाची परस्पर विल्हेवाट लावली. त्यातून सरकारला चक्क १२ कोटींचा चुना लावला गेला आहे.

गुन्हा दाखल 

भंडारा जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ९ राइस मिल मालकांविरोधात वरठी पोलीस ठाण्यात गुन्हे  नोंदवले आहेत. यापैकी ४ राइस मिल मालकांनी अटकपूर्व जामीन मिळवला असून, एका आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे.