महाराष्ट्रातील 2 मंदिरं भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल

भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन मंदिरांचा समावेश आहे. जाणून घेऊया ही मंदिरे कोणती? 

वनिता कांबळे | Updated: Nov 24, 2024, 07:29 PM IST
महाराष्ट्रातील 2 मंदिरं भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल title=

Richest Temple In India : भारतात अनेक मंदिर लोकप्रिय मंदिरे आहेत. जगभरातून भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या मंदिरांमध्ये भक्त भरभरुन दान करतात. यामुळे या मंदिराच्या संत्तीत भर पडली असून ही मंदिरं देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनली आहेत.  भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीतील दोन मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहेत. पहिलं मंदिर खूप लोकप्रिय आहे.तर, दुसरं त्याहून जास्त लोकप्रिय आहे. जाणून घेऊया ही मंदिर कोणती. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 2 शहरं भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत; पहिले नाही तर दुसरे नाव ऐकून शॉक व्हाल

तिरुपती बालाजी मंदिर देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मात्र, पहिल्या स्थानी तिरुपती बालाजी मंदिर नाही तर केरळमधील त्रिवेंद्रम येथील पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. या मंदिराच्या खजिन्यात हिरे, सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या मूर्ती आहेत. या  मंदिराच्या 6 तिजोरीत 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. मंदिरातील महाविष्णूची मूर्ती देखील सोन्याचीच आहे. या मूर्तीची अंदाजे किंमत 500 कोटींच्या आसपास आहे. 18 फूट लांब सोनसाखळी  आणि देवाला  36 किलो वजनाचा  सोन्याचा  पडदा आहे.

हे देखील वाचा...  महाराष्ट्रातील केदारनाथ! घनदाट जंगलात,छुप्या गुहेत एका खांबावर उभे असलेले रहस्यमयी मंदिर; जगाच्या विनाशाचे संकेत देणार

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत  दुसऱ्या स्थानावर आहे. तिरुपती बालाजी मंदिरात  11 टन सोने आहे. याची किंमत जवळपास 5,300 कोटींच्या आसपास आहे. मंदिर व्यवस्थापनाकडे 15,938 कोटी रुपयांची रोकड बँकांमध्ये जमा आहे. या मंदिराची एकूण संपत्ती 2.50 लाख कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते. 

हे देखीला वाचा... महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही

भारतातील मान्यताप्राप्त शक्तीपीठ मंदिरांपैकी एक असे वैष्णो देवी मंदिर देखील देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी असते. वैष्णोदेवीच्या खजिन्यात 1,800 किलो सोने आणि 4,700 किलो चांदी आहे. तर, मंदिराकडे 2,000 कोटी रुपयांची रोकड जमा असल्याचेही समजते.

महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत  तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मंदिरात 380 किलो सोने, 4428 किलो चांदी आहे. या मंदिराच्या दानपेटीत डॉलर आणि पौंड यांसारख्या विदेशी चलनाच्या रूपात मोठी विदेश रक्कम जमा होते. या मंदिराची बँकेत जवळपास 2,500 कोटींची रक्कम जमा आहे. साईबाबांच्या तिजोरीत 50,53,17,473 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. यासह मंदिराच्या 6,27,56,97488 रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्य नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडे 160 किलो सोने आहे. मंदिराचा गाभारा हा 3.7 किलो सोन्याने मढवलेला आहे. देणगी आणि प्रसादातून मंदिराला वर्षाला सुमारे 125 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळतात.

( उपलब्ध स्रोतावरून संबधीत माहिती देण्यात आलेली आहे. याबाबतच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)