Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नव नविन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील सर्व आरोपी एका सीसीटीव्हीत चित्रित झाले आहेत. येथेच देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा कट रचला गेल्याचा आरोप केला जातो. सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासच्या हाती लागले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जात असून तपासाला योग्य दिशा आणि गती मिळेल. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा झी २४ तासच्या माध्यमातून सादर केला आहे. अंजली दमानिया यांनी सादर केले पुरावे अत्यंत खळबळजणक आहे.
28-5-2024, 6-12-24 रोजी मस्साजोग येथे येऊन धमकी दिल्याची तक्रार केज पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. संतोष देशमुख हत्या आणि खडंणी हे दोन गुन्हे वेगवेगळे दाखल झाले असल्याचे दाखवले जात आहे. पोलिस आणि गुन्हेगाराच्या संगनमताने हा सर्व प्रकार घडला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
वाल्मिक कराडवर अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाल्मिक कराडविरोधात 14 FIR असून त्याच्यावर 50 ते 60 पेक्षा अधिक कलमं लावली आहेत. प्रतीक घुले 26 वर्षाचा असून त्याच्यावर 10 ते 15 गुन्हे दाखल झाले आहेत. सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल, विष्णु चाटेवर दोन गुन्हे दाखल आहेत. विष्णु चाटे याने लातुर जेलला पाठवण्याची मागणी केली. त्याच्या मागणीनुसार त्याला लातुर जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. सुंधीर सांगळे दोन कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल. कृष्णा आंधळेसह सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पालकमंत्रीपदावरच याचिका दाखल झाल्या पाहिजेत. या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 29 तारखेला खंडणी मागतली होती. यावर तेव्हाच कारवाई झाली असती तर, 5 डिसेंबरला मारहाण आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती असा दावा अंजली दामानिया यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास बीड ऐवजी मुंबईत करावी अशी मागणी केल्याचे अंजली दामानिया यांनी सांगितले. संतोष देशमुख हत्याप्रकरण न्यायालयीन चौकशी समितीचं मुख्यालय मुंबईत असणार आहे.
बीड संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय. विष्णू चाटेच्या कार्यालयातील 29 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती. याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती.. सीसीटीव्हीमध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे,बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सर्वच आरोपी दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी पाटीलही या सीसीटीव्हीत दिसत आहे.