Sharad Pawar : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार, शरद पवार यांची माहिती

Sharad Pawar : आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.   

Updated: Jan 8, 2023, 02:58 PM IST
Sharad Pawar : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार, शरद पवार यांची माहिती title=

Maharashtra Political News : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. 2024 मधील विधानसभा (Assembly Elections) आणि लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections)काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत, असं पवार म्हणाले. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. (Sharad Pawar press conference in Kolhapur ) यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) आणि काँग्रेस (Congress) तसेच शिवसेना (Thackeray Group) या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. दरम्यान, याबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही, असे त्यांनी यावेळी भाष्य केले.  

तुरुंगात डांबण्याची भाषा चुकीची - पवार

पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन काम करायचे असते. मात्र, अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे  काम नाही. त्यांच्याकडून इतरांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जात आहे, हे चुकीचे आहे. जरी शिवसेनेत दोन गट पडले असले तरी कडवा शिवसैनिक हा प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहे. तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचा फायदाच होणार आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण उद्या येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील, असेही शरद पवार म्हणाले. 

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपावर बोलण्याचे पवार यांनी टाळले. तुरुंगात टाकण्याची भाषा चुकीचे असे सांगत विषयाला बगल दिली. राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी  राणे यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली होती. त्याचेवळी ते म्हणाले, सतत चर्चेत असणारे हे पहिले राज्यपाल आहेत, त्यांच्या वक्तव्यांबाबत सतत नाराजी व्यक्त करावी लागत आहे हे योग्य नाही. राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा राखावी असा सल्ला शरद पवारांनी दिला. 

 राज्यातील सरकार कधी पडणार?, पवार म्हणाले - मी मुंबईत...

राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार फेब्रुवारीत पडणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर शरद पवार यांना सवाल करण्यात आला. यावेळी पवार म्हणाले, याबाबत मला काही माहिती नाही. आता मी मुंबईला गेल्यावर संजय राऊत यांच्याशी बोलेन आणि जाणून घेईन. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले आहे का, याबाबत मला माहिती नाही, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषद मुद्दे

- आमच्या आमच्यात मदभेद झाले तर आम्ही एकत्र बसून मार्ग काढू
पण भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरुद्ध शिवसेना असं आरोप प्रत्यारोप चालूच राहतात

- सत्ता हातात आली की जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं
पण आता सत्ता आली ही असं वागत नाहीत
काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली हे योग्य नाही
सीमभागाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होईल
त्यावेळी आपली बाजू योग्य पध्दतीने मांडावी अशी मागणी करण्यात आलीय
दिल्लीत देखील याबाबत बैठक झाली

राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा फायदा होईल

राहुल गांधी यांच्या संदर्भात काही पक्षांनी टीका टिंगलटवाळणी केली गेली.
राहुल गांधी यांनी एका पक्षा पुरते आपला कार्यक्रम ठेवला नाही, त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्य, विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते त्याच्या सोबत सहभागी झाल्याचे दिसून आलं. त्यामुळे  राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा फायदा होईल.

कुस्तीच्या आखाड्यात डोपिंग

कुस्तीच्या बाबतीत असं झालं असेल याची माहिती नाही.
आतापर्यंत असं कधी झालं नाही, पोलिसांनी तपास केला असेल तर त्याची माहिती घेऊ

जातीनिहाय जनगणना

जातीआधारीत जनगणनेची मागणी आम्ही देखील अनेक वर्षांपासून केली आहे
लहान लहान घटक आहेत त्यांची मोजमाप व्हावी
नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो

 राज्यपालांवर आम्ही देखील नाखूष 

राज्यपाल इथं नाखूष असतील तर आम्ही देखील त्यांच्याबद्दल नाखूष आहोत
पहिले राज्यपाल आहेत सतत त्यांच्यावर टीका होते, जनता टीका करते
राज्यपाल हे महत्वाचे पद आहे, त्यांनी लक्षात घ्याव.

तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणून यामध्ये काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत, असे पवार यावेळी म्हणालेत.