शरद पवार यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं बाहेरुनच घेतलं दर्शन

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं.

Updated: May 27, 2022, 04:27 PM IST
शरद पवार यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं बाहेरुनच घेतलं दर्शन title=

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे बाहेरुनच दर्शन घेतले. त्या पार्श्वभूमीवर पवार नास्तिक असल्याच्या चर्चां पुन्हा सुरू झाल्या.

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर भर सभेत नास्तिक असल्याची टीका केली होती. नुकतेच त्यांनी ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. परंतू पवार नास्तिक असल्याचा विषय आज पुन्हा चर्चेत आला. त्याचं कारण म्हणजे ते म्हणजे त्यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन! परंतू मांसाहार केलेला असल्याने पवार यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन हे बाहेरूनच घेतले.

'मी आज मांसाहार केला असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणून त्यांनी  मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले आहे'.असे पवार यांनी म्हटले. 

 दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पवार यांनी जवळच असलेल्या भिडे वाड्यालाही भेट दिली. त्याठिकाणी पाहणी केली.