सांगली : सांगलीतील भिडे गुरुजी सन्मान महामोर्चासाठी बत्तीस शिराळा येथून 65 किलोमीटर पायी चालत शिवप्रतिष्ठानचे धारकरी आले आहेत. हे धारकरी अनवानी पायाने चालत आले आहेत. भिडे गुरूजी यांच्यावर प्रेम करणारे धारकरी मोठया संख्यने सांगलीत दाखल झाले. शिवप्रतिष्ठानाच्या वतीनं सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. कोरेगाव भीमाच्या दंगलीप्रकरणी संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी क्लीनचिट दिल्यानंतर आता त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत आणि दंगली घडवणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी शिवप्रतिष्ठानची मागणी आहे. याच मागणीसाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते राज्याच्या विविध शहरात मोर्चे काढत आहेत.
पुण्यात या मोर्चाला परवानागी नाकरण्यात आली आहे. मुंबईतही भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न होता. पण पोलिसांनी परवानागी नाकारली. त्यामुळे आता मोर्चेकरी तीन गटात आझाद मैदानात एकत्र येत आहेत. पहिला गट सकाळी दहाच्या सुमारास आझाद मैदानात आला. त्यानंतर चिंचपोकळी आणि ठाण्यातून आणखी दोन गटात कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल झालेत.
नागपुरातही आज हिंदूत्ववादी संघटनांनी भिडेंच्या समर्थनात मोर्चा काढला. शिवराज्याभिषेक सोहळा समितीने महाल येथील शिवाजी चौकावर आज निदर्शनं आंदोलन केले. हिंदु सन्मान मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे चौकातच शिवराज्यभिषेक समितीने हे आंदोलन केले. समजात फूट पाडणा-या प्रवृत्तींचा खऱा चेहरा उघड करावा अशी मागणी करताना एल्गार परिषदेच्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांची चौकशी करा अशी मागणी नागपुरात करणयात आली. आंदोलकांनी केली.