ठाणे : ठाण्यात शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक गोत्यात आलाय.
ठाण्यातील शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांच्यावर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कांबळे यांच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे, इतर कुणी नाही तर कांबळे यांच्या बायकोने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलाय.
कळवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेस कांबळे फरार झालेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.