कोल्हापूर : कोल्हापूरातून एक विचित्र बातमी समोर येतय. एका अज्ञात शेतक-यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या आवाहनानंतर या शेतक-यानं हे पाऊल उचललं आहे.
कोल्हापुरात शेतीला रात्री वीज पुरवठा केला जातो. अशावेळी शेताला पाणी देताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर यांसारखे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता जिल्हाधिकारी तसंच तालुक्यातील सरकारी कार्यालयात सोडा असं आवाहन राजू शेट्टींनी केलं होतं.
राजू शेट्टींच्या या व्यक्तव्याला खरंच प्रतिसाद देत, एका शेतक-याने जीवंत साप जिल्हाधिकारी कार्यालयात सोडला.
शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी स्वाभीमानीनं आंदोलन केलं मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय..