एस.टी प्रवाशांना 'कॅशलेस स्मार्ट कार्ड'

 स्मार्ट कार्ड आपल्या बरोबरच कुटुंबातील व्यक्ती आणि इतरांनाही प्रवासासाठी वापरता येणार आहे.

Updated: Dec 7, 2017, 10:10 AM IST
एस.टी प्रवाशांना 'कॅशलेस स्मार्ट कार्ड'

मुंबई : विशिष्ट रक्कम भरुन घेतलेलं स्मार्ट कार्ड आपल्या बरोबरच कुटुंबातील व्यक्ती आणि इतरांनाही प्रवासासाठी वापरता येणार आहे. अशी सुविधा देणारी 'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध होईल.

पन्नास रुपयांचं स्मार्ट कार्ड 

या योजने अंतर्गत प्रवाशांना पन्नास रुपयांचं स्मार्ट कार्ड घेऊन त्यावर सुरुवातीला किमान पाचशे रुपये एवढी रक्कम भरणं आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम ही शंभरच्या पटीत असेल. 

१ मे पासून सुरूवात 

या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजे एक मेपासून घेता येणार आहे. एसटी आगारांमध्ये ही कार्ड उपलब्ध असतील. 

एसटी महामंडळाची योजना 

सुट्ट्या पैशांमुळे निर्माण होणा-या वादावर तोडगा काढण्यासाठी अशा प्रकारची स्मार्ट कार्ड योजना एसटी महामंडळानं आणली आहे.

या स्मार्ट कार्डनं साधी एसटी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांसाठीही हे स्मार्ट कार्ड चालणार आहे. 

रावतेंची घोषणा 

यासंबंधीची घोषणा नुकतीच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.