सांगली: ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये सहकारी बँका अडचणीत आहेत त्या ठिकाणी शिखर बँक काढून खरिपाचं पीककर्ज देण्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. ते सांगली येथे पत्रकरांशी बोलत होते. राज्यातील १२ ते १३ सहकारी बँक अडचणीत आहेत त्या जिल्ह्याच्या गावातील विविध कार्यकारी सोसायटीना तसेच प्रथमच स्थापन झालेल्या बिझिनेस करसपाउंड्स प्रतिनिधी म्हणून शेतकरी कंपन्यांमार्फत राज्य शिखर बँक कर्ज देण्याची व्यवस्था सरकार करीत असल्याचे सहकारमंत्री यांनी सांगितलंय..
दरम्यान, राज्यावरील कर्जाचा बोजा लवकरच ५ लाख कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. केंद्र सरकारने राज्याला यंदा ४२ हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळेच राज्याच्या डोक्याथवरील पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा टप्पा पार होणार आहे. अर्थ विभागातील सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
राज्यावरील कर्जाचा वाढत जाणारा बोजा ही राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. एकीकडे राज्याचा वाढत जाणारा खर्च आणि दुसरीकडे महसुली उत्पन्नात न होणारी अपेक्षित वाढ यामुळे राज्याची आर्थिक घडी बिघडलीये.