प्रशांत परदेशी, धुळे : धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. धुळ्यात 9.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. थंडीचा कडाका जिल्ह्यात वाढला असून गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे. गेले दोन दिवस 10 अंशावर स्थिर असलेलं तापमान आता 9.5 अंशावर गेला आहे. त्यामुळे धुळेकर गारठले आहेत.
खान्देशात आता थंडीची लाट येत आहे. धुळा जिल्हा गारठला असून, नागरिकांमध्ये थंडीने हुडहुडी भरली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. पण शेकोट्या आतापासूनच पेटू लागल्या आहेत.
डिसेंबर महिन्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. थंडीबरोबरच बोचऱ्या वाऱ्यांमुळे धुळेकर कुडकुडत आहेत. थंडीची लहर येत्या काही दिवसामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.