लॉजवर आली आणि मृत्यू झाला, कल्याण स्टेशन परिसरात खळबळ; महिलेसह नेमकं काय घडलं?

कल्याणमधील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिलेसह लॉजवर आलेला व्यक्ती फरार झाला आहे. 

Updated: Dec 10, 2023, 06:33 PM IST
लॉजवर आली आणि मृत्यू झाला, कल्याण स्टेशन परिसरात खळबळ; महिलेसह नेमकं काय घडलं?  title=

Kalyan Crime News: कल्याण स्टेशन परिसरात एक अत्यंत खळबळ घटना घडली आहे. एका व्यक्तीसह लॉजवर आलेल्या महिलाचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेसह असलेला व्यक्ती घटनास्थळावरुन फरार झाला आहे. लॉजमध्ये काम करणार्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार निदर्शानास आणून दिला.   

कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉज मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या लॉजमधील एका रूम मध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे . ज्योती तोरडमल असा या मृत महिलेचे नाव आहे. 9 डिंसेबर रोजी  दुपारच्या सुमारास ज्योती  एका व्यक्तीसह लॉजमध्ये आली होती. दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबरला सकाळच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला. ज्योतीसह लॉजवर आलेला  भूपेंद्र गिरी हा फरार झाला आहे. लॉजमध्ये प्रवेश करताना दोघांनी आपली ओळखपत्र जमा केली होती. यावरुन  ज्योती तोरडमल घाटकोपर येथे राहत होती. तर, तिच्यासह आलेल्या भूपेंद्र गिरी बाबत काहीच माहिती मिळालेली नाही.

नेमकं काय घडलं?

ज्योती आणि भूपेंद्र लॉजच्या ज्या रुममध्ये राहिले होते त्या रुमचा दरवाजा उघडत नव्हता.  दरवाजा उघडत नसल्याने लॉज मधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ज्योतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ महात्मा फुले पोलिसांना याबाबत माहिती दिली. महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलाय.  ज्योतीच्या सोबत आलेला भूपेंद्र गिरी हा पसार झालाय. ज्योतीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय फरार झालेल्या भूपेंद्र गिरी याच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना झालेत. भूपेंद्र ताब्यात आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. 

डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा मानपाडा पोलिसांनी भांडा फोड करुन पाच तरुणींची सुटका केली आहे. या मसाज पार्लरचा मॅनेजर नितीन भुवड याला अटक करण्यात आली आहे. मसाज पार्लर चालविणारा मालक मुकुंद वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत, डोंबिवली येथील पेंढारकर कॉलेज परिसरामध्ये आर्कीनिया नावाची इमारत आहे, या इमारतीत आर्चिस स्पा नावाचे हा मसाज पार्लर सुरु होते,
डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर कालेज परिसरामधील मानपाडा पोलिसांना माहिती मिळाली की, अनेक दिवसांपासून आर्कीनिया इमारत मसाज पार्लरच्या नावाखाली काही तरुणींकडून देह व्यापार सुरु आहे. या परिसरात मोठे कॉलेज आणि मोठी हॉटेल आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्या दरम्यान पोलिसांना काही तरुणी आढळून आल्या. मिळालेल्या माहिती नुसार पोलीस अधिक चौकशी केली असता तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली.