हेल्मेट न घातल्याने रोज इतक्या दुचाकीस्वारांचा होतोयं मृत्यू!
चारचाकी चालवताना सीटबेल्ट, दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न होत असतात. हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असते. तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं. अपघात झाल्यावर याच महत्त्व दुचाकीस्वारांना कळत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. यामूळे हेल्मेट न घातल्याने बळी पडलेल्यांची संख्या देशभरात वाढत चालली आहे. नुकतीच वाहतूक विभागातर्फे याची आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीतून तरी दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळायला हवे.
Pravin.DabholkarPravin Dabholkar | Updated: Aug 14, 2017, 03:49 PM IST
नवी दिल्ली : चारचाकी चालवताना सीटबेल्ट, दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न होत असतात. हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असते. तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं. अपघात झाल्यावर याच महत्त्व दुचाकीस्वारांना कळत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. यामूळे हेल्मेट न घातल्याने बळी पडलेल्यांची संख्या देशभरात वाढत चालली आहे. नुकतीच वाहतूक विभागातर्फे याची आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीतून तरी दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळायला हवे.
हेल्मेट घालण्यासाठी आवाहन करणारे फलक रस्त्यारस्त्यावर पाहायला मिळतात. पण अनेक दुचाकीस्वार याकडे दुर्लक्ष करतात. दंड भरावा लागू नये या भितीपोटीच काहीजण हेल्मेट घालतात. तर काही कायद्यांनाही जुमानत नाहीत. पण यआता मात्र वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनंतर तुम्हाला हेल्मेट घालण्याच गांभीर्य तुम्हाला कळणार आहे. कारण या आकडेवारीनुसार विनाहेल्मेट प्रवास रोज २८ दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो तर चारचाकी चालवताना सीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला १५ वाहनचालकांचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशी आहे राज्यांमधील आकडेवारी
२०१७ मध्ये १०,१३५ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. हेल्मेट न घातल्याने पाचपैकी एकाचा मृत्यू होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १,११३ इतकी आहे. यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर (३८१८) असून त्यानंतर अनुक्रमे तामिळनाडू (१९४६) आणि महाराष्ट्राचा (१११३) क्रमांक आहे.
चारचाकी चालकांनी सीटबेल्ट न वापरल्याने २०१६ मध्ये एकूण ५६३८ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक २७४१ जणांनी यामध्ये जीव गमावला आहे. अपघातांची आकडेवारी पाहिली तर, २०१६ मध्ये एकूण १.५१ लाख रस्ते अपघात झाले. २०१५ मध्ये हा आकडा १.४६ लाख इतका होता.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link