मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात

मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर एक भीषण अपघात झाला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 2, 2017, 08:23 PM IST
मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात title=

लोणावळा : मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर एक भीषण अपघात झाला आहे.

एक्सप्रेस-वेवर सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बोरघाट पोलीस चौकीजवळ हा अपघात झाला आहे.

एका ट्रेलर आणि कारमध्ये हा अपघात झाला आहे. सव्वा दोन तासानंतर कारमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आलं आहे.

एक्सप्रेस वेवर झालेल्या या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक आणखी काही काळ ठप्प राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुंबईकडे जाणारी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.