अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : गांधी हे कुटूंब नाहीत तर भारताचे डी एन ए आहेत. सोनिया गांधींच्या मनाचा विचार केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं पाहिजे, भारताला राहुल गांधी यांची गरज आहे, अशा आशयाचं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ केलं होतं.
Gandhi is not a ‘Family’ it’s ‘DNA of India’. If Soniyaji has made up her mind then Rahulji should lead the party. India Needs Rahul ji @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @kcvenugopalmp @SATAVRAJEEV @INCMaharashtra @bb_thorat pic.twitter.com/eiaDsirtS7
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 23, 2020
दरम्यान, यशोमती ठाकुरांच्या या ट्विटला रिट्वीट करत भाजप नेते डॉ. अनिल बोंडें यांनी यशोमती ठाकुरांवर टीका केली आहे. गांधी आपला DNA असू शकतो, पण आम्हा भारतीयांचा DNA श्री राम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. परंतु फिरोज बाटली वाला नव्हे, असं ट्विट केल्याने अमरावती जिल्ह्यातील या दोन नेत्यामध्ये ट्विटर वॉर सुरु असल्याचं दिसलं.
Gandhi might be your DNA, We Indians have DNA of shri Ram, Shri Krishna, Shri Shivaji maharaj, Maharana Pratap, Dr. B.R. Ambedkar but not firoz Bataliwala.@News18lokmat https://t.co/Twl3bxTZg4
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) August 24, 2020
काँग्रेस अध्यक्ष बदलासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्यांवर ट्विट करुन काँग्रेस नेते राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर टीका केली होती. त्यांनंतर यशोमती ठाकुरांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं. आता त्या ट्विटला भाजप नेते डॉ. अनिल बोंडें यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.