Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात मुंबईहून निघणाऱ्या Vande Bharat Express ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आपण एका नव्या आणि तितक्याच रंजक प्रवासाला निघत असल्याची भावना यावेळी प्रवाशांच्या मनात होती. पण, त्यांचा हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. कारण, प्रवासादरम्यान मागवलेल्या खाद्यपदार्थांनी प्रवाशांची निराशा केली. (Vande Bharat Express passangers got low grade food dusty Cornflakes)
वंदे भारत एक्स्प्रेसमधील (Vande Bharat Express food ) निकृष्ट दर्जाच्या जेवणाची पुन्हा जोरदार चर्चा सुरु आहे. निमित्त ठरत आहे, ते म्हणजे व्हायरल होणारा एक फोटो. मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारतमध्ये धुळमिश्रित कॉर्न्सफ्लेक्स (Cornflakes) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीरेश नारकर असं या प्रवाशाचं नाव असून, त्यानं ट्विट करत रेल्वे विभागाकडे याविषयीची तक्रार केली.
रेल्वेचं फ्लोरिंग कार्पेट असल्यामुळं इथं स्वच्छतेसाठी पारंपरिक पद्धतींऐवजी व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करावा असं सांगताना या प्रवाशानं कुणालाही धुळीनं भरलेले कॉर्नफ्लेक्स खायला आवडणार नाही, असा तक्रारीचा सूर आळवला. रेल्वेला असणाऱ्या Executive Class ची जागा ही मध्येच असल्यामुळं तिथून ये- जा करणाऱ्या इतर प्रवाशांमुळं Privacy नावाची गोष्टच उरत नसल्याचा मुद्दाही त्यानं अधोरेखित केला.
Travelling by Magnificat Vande Bharat express to Shirdi.
Few problem that can be improved
1) Executive Class is given in middle of train, hence other class people keep moving continuously and there is no privacy even after paying more. EC should be at front or back of train. pic.twitter.com/OfQiMoZXNS— Viresh Narkar (@vireshnarkar) February 12, 2023
रेल्वे विभागाकडे (Indian Railway) करण्यात आलेल्या या तक्रारीची तातडीनं नोंद घेत त्यावर कारवाईची हमीही देण्यात आली. अशी तक्रार येण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण, आणखी एका प्रवाशानेही एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये देण्यात येणा-या खाद्यपदार्थाला वास येत असल्याचीही तक्रार नोंदवली आहे.
काही दिवसांपूर्वीच हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही असाच खळबळजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. जिथं प्रवाशाला देण्यात आलेल्या वड्यातून चक्क तेल गळत निथळत होतं. एकिकडून प्रवाशांना लज्जतदार जेवणाची, खाद्यपदार्थांची हमी देऊन त्यांचं लक्ष वेधणाऱ्या या रेल्वे विभागाकडून अशा चुका सातत्यानं होत असल्यामुळं आता प्रवाशांचाही संताप अनावर झाला आहे. तेव्हा रेल्वेकडून यावर कोणती कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.