विकास भोसले, झी मीडिया, सातारा : महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाची गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी जलसिंचन विभागाला आदेश दिले आहेत. ही गळती लवकरच थांबवण्यात येईल, यासाठी आणखी तीन महिने लागू शकतात, असं जलसिंचनचे अधिक्षक अभियंत्यांनी सांगितलं आहे.
पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर गळती रोखण्यासाठी काम सुरू करण्यात येईल, तसेच जे पाणी वाहून जात आहे, ते पुन्हा रिस्टोअर करण्यात येईल आणि ते शक्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे.
महाबळेश्वर शहराची जलवाहिनी असलेल्या 'वेण्णा लेक'ची ख्याती देशभर पसरली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वेण्णा लेक सन २००० साली बांधण्धयात आले.
तसंच लाखो पर्यटकांचे नौका विहार करणारे महाबळेश्वर येथील वेण्णा लेक सन २००० साली बांधण्धयात आले मातीमध्ये हे बांधलेले धरण असुन ०.६१२ टिएमसी पाणीसाठा होतो सध्या धरणाला मोठी गळती लागली असुन दररोज ५ लाख लिटर पाणी वाया जात आहे या वेण्णा लेक मध्ये नगरपालिकेचा लाखो रुपयेचा महसुल मिळतो
वेण्णा धरणाची गळती जलसंपदा विभागाने लवकर थांबवली नाही तर. महाबळेश्वर शेजारील १२ गावांना धोका निर्माण होउ शकतो. दररोज ५ लाख लीटर पाणी वायाय जात असल्यानं वेण्णा लेक मध्ये पाणीच शिल्लक राहणार नाही अशी भिती स्थानिकानी व्यक्त केली आहे.
आता १५ लाख पर्यटकांचे खास आकर्षण असलेले वेण्णा लेक वाचविण्यासाठी जलसंपदा विभाग काय पायल उचलते हे पहावे लागेल.