Chitra Wagh Exclusive: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला तीन वर्षे होऊन गेली आहेत. मात्र, तिला अजून देखील न्याय मिळाला नाहीये. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अशातच झी 24 तासच्या जाहीर सभा या कार्यक्रमात महिला आमदार चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.
ज्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणाला आता तीन वर्षे होऊन गेली आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणात पूजा चव्हाणला न्याय मिळालेला नाहीये. त्यावर चित्रा वाघ यांनी आपलं मत माडलं आहे.
पूजा चव्हाणला न्याय मिळणार का?
पूजा चव्हाण प्रकरणाला तीन वर्षे होऊन देखील अजूनही तिला न्याय मिळालेला नाहीये. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, माझी लढाई चालू आहे. मागे सुद्धा हायकोर्टामध्ये मी केस टाकली आहे. त्याआधी देखील मी लढत होते. परंतु कोणीतरी अशा बातम्या लावल्या की चित्रा वाघ यांनी ती केस काढून घेतली. मी ती केस का काढून घेईन. ती मुलगी माझ्या जातीची कोणी लागत नाही. माझी नातेवाईक देखील नाही. परंतु ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यामुळे मला असं वाटलं की आपण या प्रकरणावर बोललं पाहिजे आणि मी बोलले देखील.
या प्रकरणात मी काय-काय सहन केलं आहे, ते मी आणि माझ्या कुटुंबाला माहिती आहे. शेवटी कसं आहे न्यायदेवता आहे. पण मी माझा प्रश्न उपस्थित केला आहे. मी ती केस काढलेली नाही. ती केस अजूनही चालू आहे. त्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा तो समोर येईल. परंतु माझी लढाई चालू आहे. मात्र, चुकीच्या बातम्या लावल्यावर खूप वाईट वाटतं. आता देखील या प्रकरणाच्या तारखा चालू आहेत. या आठवड्यात देखील आहे. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे.
तुमचं टार्गेट फक्त सरकार होतं
पूजा चव्हाण प्रकरणी आता अनेक लोक माझ्या जवळ शाहणपणा शिकवायला येतात. खूप जण सांगतात. ज्यावेळी मी एकटी लढत होते, तेव्हा तुम्ही का माझ्यासोबत आला नाही. असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला होता. तुम्हाला त्यावेळी वाटलं नाही का? मला कोणी नाही सांगितलं मला जे वाटलं ते मी केलं. मात्र, त्यावेळी कोणीच आलं नाही. पण आता खूप जण येत आहेत.
उद्धव ठाकरेंनी क्लीन चीट का दिली?
पूजा चव्हाण प्रकरणी सर्वात जास्त टिकेला समोर हे तुम्हाला जावं लागलं. त्यावेळी तुम्ही संजय राठोड यांच्या विरोधात होता. त्यानंतर सत्तेत तुम्ही एकत्र होता त्यावेळी देखील तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, मी आता आमदार झाली आहे. पण मी लढाई अजून सोडलेली नाहीये. ही चालूच राहणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ते म्हणाले की त्यांना या प्रकरणात क्लीन चीट मिळाली होती. त्यानंतर संजय राठोड यांना मंत्री केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कारणं सांगितली पाहिजेत की संजय राठोड यांना क्लीन चीट कशी दिली.