अमर काणे, नागपूर : नागपुरात हौशी तरुणांनी एका मस्त उत्सवाचं आयोजन केलं होतं. शहराततल्या वारसस्थळांची माहिती व्हावी, यासाठी हेरिटेज फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या उपराजधानीतल्या या हेरिटेज फेस्टिवलला अनेकांनी हजेरी लावली. नागपुरात हेरिटेज अर्थात वारसारूपाने पाहिलं जावं, अशा अनेक पाऊलखुणा आहेत. मात्र या हेरिटेज वास्तूचं महतत्व अनेकांपर्यंत पोहचतच नाही. अखेर नागपुरातल्या तरुणांनी हेरिटेज संर्वधनासाठी एक पाऊल पुढे टाकत हेरिटेज फेस्टिवलचं आयोजन केलं होतं.
ऐतिहासिक काशीबाई मंदिर परिसरात हा उत्सव रंगला. शहरातले नामवंत चित्रकार, शिल्पकार यांचे कलाविष्कार या उत्सवात पाहायला मिळाले. या फेस्टिवलमध्ये काही ऐतिहासिक वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. ऐ जिंदगी फाऊंडेशन आणि काजवा ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिवलला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळाला.