कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणे आणि मुलुंड यांच्यात नवं रेल्वे स्टेशन होणार आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टेशनच्या जागेचं सर्वेक्षण केलं. इथे अतिक्रमण केलेल्या २०० कुटुंबांचं पुनर्वसन विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. तिकीट घर, बस टर्मिनल, कमर्शिअल प्लाझाचीही उभारणी होणार आहे. सध्या सीएसटीवरून ठाण्यासाठी १७२ धीम्या तर जल मार्गावर १३ फेऱ्या होतात. आता ठाणे लोकलच्याकाही फेऱ्या या स्थानकातून सुरू होतील.
ठाणे शहरातल्या मनोरूग्णालयाच्या जागेवर नवं विस्तारीत स्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. यातून ठाणे स्टेशनवरचा भार ३१ टक्के कमी होणार असून मुलुंड स्टेशनवरचा भार २१ टक्के कमी होणार आहे. नव्या रेल्वे स्थानकामूळे ठाणे शहरातली वाहतूक कोंडी सुटणार असून याचा साडेसात लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
भूमीपूजन झाल्यावर अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. रोजच्या गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. हा प्रकल्प जवळपास २८९ कोटींचा आहे.गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाची परवानगीनंतर प्रकल्पाला हिरवा कंदी मिळाला. ठाण्यातल्या मनोरूग्णालयाची जागा यासाठी निश्चित झालीय.
रेल्वे स्टेशन, नाल्यावरील पूल, रेल्वे ट्रॅक, पादचारी पूल, सिग्नल यंत्रणा यांचं काम
स्टेशनबाहेर पार्कींग, सुरक्षा भिंतीची उभारणी
ठाणे स्टेशन परिसरातल्या सॅटीससारखे तीन जोडरस्ते इथेही
आनंदनगर चेकनाका, साठेवाडीतला डीपी रोड, मुलुंड चेकनाका इथे हे रस्ते
भविष्यात ठाणे मेट्रोला हे स्टेशन जोडले जाणार
रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टेशनच्या जागेचं सर्वेक्षण केलं. इथे अतिक्रमण केलेल्या २०० कुटुंबांचं पुनर्वसन विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. तिकीट घर, बस टर्मिनल, कमर्शिअल प्लाझाचीही उभारणी होणार आहे. सध्या सीएसटीवरून ठाण्यासाठी १७२ धीम्या तर जल मार्गावर १३ फेऱ्या होतात. आता ठाणे लोकलच्याकाही फेऱ्या या स्थानकातून सुरू होतील.